LIVING STREAM MINISTRY

मोठ्या प्रमाणावरील वितरणाकरता प्रकाशन

पूर्वविलोकन आणि पुस्तकांच्या फाइल्स डाउनलोड करा

ह्या मालिकेतील पुस्तकांची यादी खाली दिली आहे आणि पुस्तके मूलभूत ते माध्यमिक ते प्रगत विषयांवर योजिली आहेत. पुस्तके डाउनलोड करण्याकरता जर तुम्हाला मदत हवी असेल, तर आमच्या Support Page ला भेट द्या. तुमचे पुस्तक डाउनलोड होणे शक्य व्हावे याकरता खालील वितरण नीतीशी कृपया सहमत व्हा.

ह्या संकेत स्थळावर फाइल्स वितरणाकरता असलेली आमची नीती

या सात पुस्तकांच्या इलेक्ट्रॉनिक आवृत्त्या मोफत उपलब्ध करून देण्यात लिव्हिंग स्ट्रीम मिनिस्ट्रीला आनंद होत आहे. आम्हाला आशा आहे की अनेकजण ही सर्व पुस्तके वाचतील आणि त्याविषयी इतरांना सांगण्यात संकोच बाळगणार नाहीत. सुव्यवस्थेकरता या फाइल्सची छपाई तुमच्या वैयक्तिक उपयोगापुरती मर्यादीत ठेवा असे आम्ही सांगतो. कृपया या फाईल्स इतरत्र कोणत्याही स्वरूपात रिपोस्ट करू नका. ह्या पलिकडे जर तुम्हाला हुबेहूब नक्कल प्रती घेण्याची इच्छा असेल, तर कृपया उपयोग करण्याच्या हेतूचे तपशीलवार लिखित स्पष्टीकरण आणि परवानगीकरता विनंती[email protected] येथे पाठवा. आम्ही अशी देखील विनंती करतो की सर्व कॉपीराईट सूचनांचा संबंधित कायद्यानुसार आदर केला जावा. कोणत्याही मार्गे इतर कोणत्याही उपयोगाकरता या पीडीएफ फाइल्समध्ये बदल केला जाऊ नये किंवा त्या सुट्या केल्या जाऊ नयेत.

ख्रिस्ती जीवनाची मूलतत्वे, पुस्तिका एक
ख्रिस्ती जीवनाची मूलतत्वे, पुस्तिका एक
by Witness Lee and Watchman Nee
मलपृष्ठावरूनः "ख्रिस्ती जीवन हे महत्वपूर्ण आणि अर्थपूर्ण आहे तथापि, देवाच्या वचनात, पवित्र शास्त्रात, सादर करण्यात आलेले या जीवनाचे मूलभूत घटक अनेक लोकांना समजत नाहीत. वॉचमन नी आणि विटनेस ली लिखित ख्रिस्ती जीवनाची मूलतत्वे, भाग एक, यामध्ये ख्रिस्ती जीवनाची ओळख करुन देण्यात आली आहे आणि त्याचे वर्णन केले आहे. मानवी जीवनाचे रहस्य यावरील पहिल्या प्रकरणात देवाची तारणाची योजना सादर केली आहे. पुढील प्रकरणे ख्रिस्ती माणसाकरता अनेक मूलभूत अनुभवांचा तपशील देतात. विश्वासणाऱ्यांच्या ख्रिस्ती जीवनाकरता अंतिम किल्ली शेवटल्या प्रकरणात सादर केली आहे-मानवी आत्म्यात ख्रिस्ताचा अनुभव. जे देवाचा शोध घेतात आणि जे ख्रिस्तात वाढण्याची अभिलाषा बाळगतात त्यांच्यासाठी हे संदेश समृद्ध आणि अर्थभरीत ख्रिस्ती जीवनाकरता भक्कम पाया स्थापित करतील."

डाउनलोड PDF हे पुस्तक डाउनलोड करणे शक्य करण्याकरता कृपया वितरण नीतीशी सहमत व्हा.

ख्रिस्ती जीवनाची मूलतत्वे, पुस्तिका दोन
ख्रिस्ती जीवनाची मूलतत्वे, पुस्तिका दोन
by Watchman Nee and Witness Lee
मलपृष्ठावरूनः “प्रत्यक्ष ख्रिस्ताला जाणणे हा ख्रिस्ती जीवनाचा मध्यवर्ती मुद्दा आहे. ह्याकरता आम्ही दररोज जिवंत मार्गाने त्याच्याशी संपर्क साधण्याची आणि त्याला अनुभवण्याची गरज आहे. ह्या अनुभवात योग्य आध्यात्मिक अन्न, नियमित आध्यात्मिक उपासना आणि खोल आध्यात्मिक वाढ यासमवेत काही मूलभूत तत्वे समाविष्ट आहेत. वॉचमन नी आणि विटनेस ली यांच्याद्वारे लिखित ख्रिस्ती जीवनाची मूलतत्वे भाग 2 यामध्ये निरामय ख्रिस्ती जीवनाकरता तीन मूलतत्वे सादर केली आहेतः प्रभूसह वेळ व्यतित करणे, साध्या मार्गाने त्याच्याशी संपर्क साधणे, आणि प्रभूमध्ये खोलवर वाढणे. हे संदेश शोधक ख्रिस्तीजनांना देवाच्या वचनातील समृध्द पोषणामध्ये, ख्रिस्तासहच्या क्षणोक्षणीच्या संपर्कामध्ये आणि देवाच्या खोल दडलेल्या अनुभवामध्ये आणतील.”

डाउनलोड PDF हे पुस्तक डाउनलोड करणे शक्य करण्याकरता कृपया वितरण नीतीशी सहमत व्हा.

सर्व समावेशक ख्रिस्त
सर्व समावेशक ख्रिस्त
by Witness Lee
मलपृष्ठावरूनः "संपूर्ण जुना करारभर आढळणारे सर्व नमुने आणि प्रतिके, आमचा प्रभू आणि तारक येशू ख्रिस्त याचे अद्भूत चित्र सादर करतात. सर्वात महत्वपूर्ण तथापी दुर्लक्षिल्या गेलेल्या नमुन्यांपैकी एक आहे उत्तम भूमी. सर्व समावेशक ख्रिस्त या पुस्तकात विटनेस ली अनुवादाच्या पुस्तकांच्या भागांचे विश्लेषण करतात, दाखवून देतात की इस्राएलाच्या लेकरांनी वतन म्हणून घेतलेली भूमी आमच्या नविन कराराचे वतन म्हणून असलेल्या सर्वसमावेशक ख्रिस्ताचा पूर्ण नमुना आहे. उत्तम भूमीतील अगाध समृद्धीच्या काहींचा तपशीलवार अभ्यास सादर करतात. प्रत्येक नमुना स्पष्ट केला आहे आणि विश्वासणारे या नात्याने असलेल्या आम्हास लागू केला आहे. आरंभापासून शेवटपर्यंत सर्व समावेशक ख्रिस्त हे पुस्तक देवाच्या सनातन उद्देशाच्या पूर्णतेकरता उत्तम भूमी या नात्याने असलेल्या ख्रिस्ताला दररोज अनुभवण्यासाठी आणि आस्वादण्यासाठी देवाच्या शोधकाला प्रोत्साहीत करते.”

डाउनलोड PDF हे पुस्तक डाउनलोड करणे शक्य करण्याकरता कृपया वितरण नीतीशी सहमत व्हा.

देवाची व्यवस्था
देवाची व्यवस्था
by Witness Lee
मलपृष्ठावरूनः "1927 मध्ये वॉचमन नी यांनी ख्रिस्ती वाढ व प्रगती यावरील त्यांचे द स्पिरिच्युअल मॅन हे उत्कृष्ट पुस्तक प्रकाशित केले. त्या पुस्तकात नी सोपी पवित्रशास्त्रीय सत्ये सादर करतात की मानव तीन भागांचा आहे - आत्मा जीव आणि शरीर - जे विश्वासणाऱ्यांनी त्यांच्या आध्यात्मिक जीवनात वाढावे आणि प्रगती करावी या करता त्यांच्यासाठीचे मध्यवर्ती व आवश्यक प्रगटीकरण आहे. देवाची व्यवस्था या पुस्तकात नीं चे निकटचे व सर्वात विश्वासू सहकारी विटनेस ली पवित्र शास्त्राचे मध्यवर्ती प्रगटीकरण की मंडळीत देवाच्या पूर्ण ओळखीकरता देव स्वतःला मानवामध्ये भरून टाकू इच्छितो, उघड करण्यासाठी ह्या पायावर बांधणी करत आहेत. ही देवाची योजना आहे, देवाची व्यवस्था आहे. देवाची व्यवस्था या पुस्तकात ली स्पष्टपणे देवाच्या व्यवस्थेनुसार असलेली दैवी त्रैक्याची चाल प्रगट करतात आणि देवाचा सनातन उद्देश पूर्ण व्हावा यासाठी त्याच्यासह सहकार्य करण्यासाठीचे व्यावहारिक मार्ग विश्वासणाऱ्यांना देतात. पायरी पायरीने विटनेस ली दाखवितात की आध्यात्मिक वाढीसाठीच्या अडथळ्यांशी कसा व्यवहार करायचा, जेणेकरून आमच्या हृदयात ख्रिस्त त्याचे पूर्ण घर करेल म्हणजे की आम्ही देवाच्या सर्व पूर्णतेप्रत भरले जाउ."

डाउनलोड PDF हे पुस्तक डाउनलोड करणे शक्य करण्याकरता कृपया वितरण नीतीशी सहमत व्हा.

ख्रिस्ती जीवनाची मूलतत्वे, पुस्तिका तीन
ख्रिस्ती जीवनाची मूलतत्वे, पुस्तिका तीन
by Watchman Nee and Witness Lee
मलपृष्ठावरूनः "ख्रिस्ती जीवनाकरता मूलभूत असलेले ख्रिस्ताचे आणखी अनुभव आहेत. विश्वासणारे या नात्याने आम्ही बरोबर आणि चूक या तत्वानुसार जगण्याऐवजी जीवनाच्या उच्चतम तत्वानुसार जगावे. देवाचे जीवन जेंव्हा आमच्या आत काम करते, तेव्हा या जीवनाचे चकाकणे आम्हास योग्य जगण्यामध्ये आणते आणि इतर विश्वासणाऱ्यांसह आमची बांधणी, देवाची जी सामुदायिक ओळख मंडळी, तीमध्ये करते. वॉचमन नी आणि विटनेस ली यांच्याद्वारे लिखित ख्रिस्ती जीवनाची मूलतत्वे भाग 3, यामध्ये हे अनुभव तपशीलवार मांडले आहेत. विश्वासणाऱ्यांची प्रभूमध्ये वैयक्तिक वाढ आणि मंडळीची वाढ आणि बांधणी, या दोहोंकरता हे संदेश सर्व विश्वासणाऱ्यांमध्ये आध्यात्मिक अन्न भरतील."

डाउनलोड PDF हे पुस्तक डाउनलोड करणे शक्य करण्याकरता कृपया वितरण नीतीशी सहमत व्हा.

जीवनाचे ज्ञान
जीवनाचे ज्ञान
by Witness Lee
मलपृष्ठावरूनः “देवाची अभिलाषा आणि हेतू, त्याची प्रतिमा धारण करणाऱ्या, त्याचे गौरव प्रकट करणाऱ्या, आणि त्याच्या शत्रूसह व्यवहार करण्यासाठी त्याचा अधिकार बाळगणाऱ्या मानवामध्ये पूर्ण, सामुदायिक ओळख मिळवणे हा आहे. तथापि, अगदी थोडक्या विश्वासींना खात्री आहे की ही अभिलाषा आणि हेतू फक्त देवाच्या स्वतःच्या जीवनाकरवी साध्य होऊ शकतो. ख्रिस्ताचे मरण आणि पुनरुत्थान यामधून आम्हाकरता उपलब्ध करण्यात आलेल्या दैवी जीवनाला जाणण्याच्या आणि अनुभवण्याच्या बाबीला देखील अगदी थोडक्यांनी स्पर्श केला आहे. जरी अनेक शोधक विश्वासणारे आहेत, तरी थोडक्यांना जीवनाचा मार्ग सापडला आहे. उलटपक्षी, जीवनाऐवजी कळकळ, ज्ञान, सामर्थ्य आणि कृपादाने यासह अनेक गोष्टी चुकीने घेतल्या गेल्या आहेत. जीवनाचे ज्ञान या पुस्तकात विटनेस ली, आमचे दैवी जीवनाचे प्रारंभिक स्वीकारणे जे पुनर्जनितीकरण, त्यापासून आरंभ करुन आणि आंतरीक जीवनाच्या णीवेनुसार जाणणे आणि प्रगती करणे यासाठी जीवनाकडे नेणारा मार्ग प्रकाशित करतात. जीवनाचे ज्ञान हे पुस्तक ख्रिस्ताच्या अस्सल अनुभवाकरता पाया आहे आणि विटनेस ली यांचे जीवनाचा अनुभव हे जे यासोबतचे पुस्तक आहे त्याकरता मदतपूर्ण प्रस्तावना आहे."

डाउनलोड PDF हे पुस्तक डाउनलोड करणे शक्य करण्याकरता कृपया वितरण नीतीशी सहमत व्हा.

गौरवशाली मंडळी
गौरवशाली मंडळी
by Watchman Nee
मलपृष्ठावरूनः "देव मंडळीला, उद्धरीत विश्वासणाऱ्यांना, स्वर्गीय दृष्टीकोनातून पाहतो. पाप आणि पापांची सत्ता याद्वारे पराभूत असे तिला पाहण्याऐवजी देव मंडळीला विजयशाली आणि ख्रिस्ताचा गौरवशाली समभाग, जो सर्वात सर्वकाही भरतो अशा एकाला पूर्णपणे व्यक्त करणारी म्हणून पाहतो. गौरवशाली मंडळी या पुस्तकात वॉचमन नी पवित्रशास्त्रातील मंडळीच्या चार महत्वपूर्ण सादरीकरणाविषयी चर्चा करतातः उत्पत्ती 2 मधील हव्वा, इफिस 5 मधील पत्नी, प्रकटीकरण 12 मधील स्त्री, आणि प्रकटीकरण 21 आणि 22 मधील वधू. प्रत्येक उदाहरणात ते देवाचा सनातन उद्देश पूर्ण करण्याकरता असलेले मंडळीचे उच्चतम पाचारण सादर करतात. हल्लीच मिळालेल्या हस्तलिखित टिपणांच्या पुरवणीने गौरवशाली मंडळीचे हे नविन, ताजे भाषांतर, बंधू वॉचमन नी यांनी 1939 च्या वसंत ऋतूत आणि 1942 च्या वसंत ऋतूत दिलेल्या संदेशांची पूर्ण नोंद बनले आहे."

डाउनलोड PDF हे पुस्तक डाउनलोड करणे शक्य करण्याकरता कृपया वितरण नीतीशी सहमत व्हा.